Saturday 19 May 2018

शिवाजी विद्यापीठाच्या रोजगार महामेळाव्यास महाप्रतिसाद

साडेनऊ हजार रोजगार संधींसाठी २३ हजार उमेदवारांची उपस्थिती


शिवाजी विद्यापीठात आयोजित रोजगार व कौशल्य महामेळाव्याचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. आर.व्ही. गुरव आदी.
शिवाजी विद्यापीठात आयोजित रोजगार व कौशल्य महामेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. आर.व्ही. गुरव, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील आदी.
शिवाजी विद्यापीठात आयोजित रोजगार व कौशल्य महामेळाव्यास उपस्थित असणाऱ्या उमेदवारांशी संवाद साधताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आदी.


शिवाजी विद्यापीठात आयोजित रोजगार व कौशल्य महामेळाव्यास उपस्थित उमेदवार नावनोंदणीचा अर्ज काळजीपूर्वक भरत असताना.

शिवाजी विद्यापीठात आयोजित रोजगार व कौशल्य महामेळाव्यास उपस्थित उमेदवार नावनोंदणीचा अर्ज काळजीपूर्वक भरत असताना.

शिवाजी विद्यापीठात आयोजित रोजगार व कौशल्य महामेळाव्यास उपस्थित उमेदवार नावनोंदणीचा अर्ज काळजीपूर्वक भरत असताना.

शिवाजी विद्यापीठात आयोजित रोजगार व कौशल्य महामेळाव्यात स्पॉट रजिस्ट्रेशन करीत असलेले उमेदवार.

शिवाजी विद्यापीठात आयोजित रोजगार व कौशल्य महामेळाव्यात मुलाखतीच्या ठिकाणाची माहिती देणारे फलक विद्यापीठाने परिसरात ठिकठिकाणी लावले होते.
शिवाजी विद्यापीठात आयोजित रोजगार व कौशल्य महामेळाव्यात मुलाखतीच्या ठिकाणी उमेदवारांच्या अशा रांगा लागलेल्या होत्या.
शिवाजी विद्यापीठात आयोजित रोजगार व कौशल्य महामेळाव्यात काही रोजगार प्रदात्यांनी उमेदवारांच्या ऑनलाइन परीक्षा घेतल्या.


शिवाजी विद्यापीठात आयोजित रोजगार व कौशल्य महामेळाव्यात उमेदवारांच्या मुलाखती घेताना विविध कंपन्यांचे एच.आर. मॅनेजर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित रोजगार व कौशल्य महामेळाव्यात उमेदवारांच्या मुलाखती घेताना विविध कंपन्यांचे एच.आर. मॅनेजर.

कोल्हापूर, दि. १९ मे: शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि मध्यवर्ती रोजगार कक्ष  व महाराष्ट्र शासनाचा विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार व कौशल्य महामेळाव्यास रोजगार प्रदाते, कौशल्य प्रदाते आणि इच्छुक उमेदवारांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. साडेनऊ हजारांहून अधिक रोजगार संधींसाठी सुमारे २३ हजार उमेदवारांनी विद्यापीठाच्या परिसरात उपस्थिती दर्शविली.
आज सकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते रोजगार व कौशल्य महामेळाव्याचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक व अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. भारती पाटील, मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. गजानन राशिनकर यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
उद्घाटनानंतर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी लोककला केंद्रातील विविध कौशल्य प्रदान स्टॉल्सची फिरुन पाहणी केली. यावेळी नोंदणीसाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशीही त्यांनी संवाद साधला. यानंतर मुलाखतीची व्यवस्था करण्यात आलेल्या विविध अधिविभागांना कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी भेट देऊन त्या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. रोजगार प्रदात्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचे स्वागत केले.
विद्यापीठात आज माहिती तंत्रज्ञान, बी.पी.ओ., सेवा क्षेत्र, एच.आर., विपणन, विक्री, बँकिंग, फायनान्स विमा, अन्य वित्तीय संस्था, वस्त्रोद्योग, टेलिकॉम, अभियांत्रिकी आदींसह रिक्रुटिंगच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या सुमारे १२२ कंपन्यांनी विविध ९,५३९ पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. काही कंपन्यांनी लेखी तसेच ऑनलाईन परीक्षाही घेतल्या. या पदांसाठी यापूर्वीच दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी ऑनलाइन व ऑफलाईन स्वरुपात नावनोंदणी केलेली होती. आज सकाळपासूनच विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पॉट नोंदणीसाठी उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने सुमारे ५० नोंदणी कक्ष सुरू केले होते. त्यामुळे उमेदवारांना नोंदणी करणे सोयीचे झाले. या मेळाव्यासाठी त्यामुळे एकूण २३ हजार ७६९ उमेदवारांनी नोंदणी केली. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांना विविध कंपन्या व त्यांच्या मुलाखत कक्षाची माहिती पत्रकाद्वारे तसेच ठिकठिकाणी माहिती फलकांद्वारे उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना थेट मुलाखतीच्या ठिकाणी जाता आले. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, वनस्पतीशास्त्र, भूगोल, मानव्यविद्या इमारत, वि.स. खांडेकर भाषा भवन, गणित आणि तंत्रज्ञान अशा नऊ विविध अधिविभागांमध्ये विविध कंपन्यांसाठी क्षेत्रनिहाय मुलाखतींची व्यवस्था करण्यात आल्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी न होता रोजगार मेळाव्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. त्याचप्रमाणे लोककला केंद्रात तीस विविध संस्थांनी स्टॉल्स उभारुन त्या ठिकाणी विविध ५० कौशल्ये सुमारे ६५०० उमेदवारांना मोफत प्रदान केली.
दरम्यान, विद्यापीठाचा सुरक्षा विभाग तसेच कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे तसेच पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केल्यामुळे वाहतूक समस्या उद्भवली नाही. अग्नीशमन बंब व प्राथमिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज अँब्युलन्स वाहन यांचीही स्थानिक प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली. विद्यापीठाने उमेदवारांना पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. उपस्थित उमेदवारांनीही स्वयंशिस्तीचे दर्शन घडवून अत्यंत शांततेने व शिस्तबद्ध पद्धतीने मुलाखती दिल्या.

No comments:

Post a Comment