Friday 1 July 2016

वृक्ष लागवडीबाबत झालेली जाणीव जागृती उत्साहवर्धक: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील


जिल्ह्यातील वृक्षारोपण मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठात प्रारंभ; 
जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड







कोल्हापूर, दि. १ जुलै: महाराष्ट्रात आणखी पन्नास कोटी वृक्ष असणे आवश्यक आहे. त्यासाठी यावर्षी पासूनच शासनाने कोटी वृक्ष लागवड मोहिम हाती घेतली असून या मोहिमेचा शुभारंभ आज राज्यात सर्वत्र एकाच वेळी होत आहे. वृक्ष लागवडीबद्दल लोकांमध्ये झालेली जाणीव जागृती पाहता आज राज्यात कोटी ऐवजी कोटी वृक्ष लागवड होईल, असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. निसर्ग संवर्धनासाठी अधिक झाडे लावा आणि ती जगवा, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यासह महाराष्ट्र शासनाचे वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वन महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै ते 7 जुलै कृषी सप्ताहाचा प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठ परिसरात करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्रीय संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, वनसंरक्षक एम.के.राव, उप-वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक टी.पी.पाटील उपस्थित होते.
वृक्ष लागवड जितकी महत्वाची, तितकेच वृक्ष जगवणेही महत्त्वाचे असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, वृक्ष संवर्धनासाठी समाजातील दानशू व्यक्तींनी पुढाकार घ्यावा देखभालीसाठी निधी उपलब्ध करावा. निसर्ग संवर्धन ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोल्हापूरच्या सौंदर्यीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली असून त्या अंतर्गत एक लाख झाडे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कृषी दिनाच्या अनुषंगाने बोलताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मृदा आरोग्य पत्रिका अभियान राबवित असताना केवळ आकडेवारीवर भर देता ते मोहिम म्हणून राबवावे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या काही वर्षांमध्ये तापमानातील वाढ वातावरणातील बदल, दुष्काळ यामुळे मानसाला वृक्षांचे महत्व पटले असून प्रत्येकाने वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होणे वृक्ष संवर्धनाची जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने जिल्ह्यात वीस हजार वृक्षांची लागवड करण्याची मोहीम हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठ परिसरात सध्या १३ हजार झाडे असून आणखी १५ हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यापैकी आज हजार झाडे लावण्यात येणार आहेत. शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले एन्व्हायर्नमेंट ऑडिट करणारे विद्यापीठ आहे. एक वृक्ष साधारणपणे दोन व्यक्तींना आवश्यक इतका ऑक्सिजन उत्सर्जित करतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने किमान तीन वृक्ष लावून ते जगवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, जिल्ह्यात वन वाढविणे आणि कृषीची उत्पादकता वाढविणे हे दोन्ही महत्वाकांक्षी उपक्रम सुरु असून जिल्ह्याने सहा लाख वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ५८०० ठिकाणे निवडून आठ लाख वृक्ष लागवड करुन १३३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचे सांगितले. यामध्ये जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या 'रोप दान पुण्यसंचय' या अभिनव योजनेच्या माध्यमातून गेल्या १० दिवसां ११ हजार रोपे लोकांनी दान केली आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त जिल्ह्यातील १२५ गावांनी किमान १२५ रोपे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
नरेगा'अंतर्गत शासकीय विभागांनी केलेल्या वृक्ष लागवडीचे संगोपन संवर्धन केले जाणार आहे, असे सांगून जिल्ह्यात रोप लावणीतून ऊस उत्पादन कार्यक्रम यशस्वी करण्यात येणार आहे. तसेच मध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना फार्म प्रोड्युसर कंपनी म्हणून मार्गदर्शन देऊन यालाही गती देण्यात येणार असल्याचे डॉ. सैनी यांनी सांगितले. जिल्ह्यात लाख मृद आरोग्य पत्रिका देण्यात आल्या असून हुमनी नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून त्यामधू लाख हेक्टरवरील हुमनी नियंत्रणाची क्षमता जिल्ह्यात निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वन संरक्षक एम.के.राव यांनी वन महोत्सवाचे रुपांतर लोकचळवळीत व्हायला पाहिजे. प्रत्येकाने वृक्षांचे महत्व जाणून झाडे जगवली पाहिजे सृष्टी फुलवली पाहिजे, असे आवाहन केले. जिल्हा धीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी कृषी दिनाचे महत्त्व विषद केले. यावेळी कृषी विभागाकडील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत झालेल्या स्पर्धेचे बक्षिस वितरण, जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले.
यावेळी उप वन संरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी स्वागत सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक टी.पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत नाट्य शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षगीत सादर केले. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी लोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment